आ.सना मलिक यांचे प्रेमलता पारवे आणि नगरसेवकांच्या विजयासाठी ‘पायी वादळ’
रॅली आणि सभांना प्रचंड प्रतिसाद
बीड प्रतिनिधी : आगामी बीड नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार गट), शिवसेना आणि शिवसंग्राम मित्र पक्षाने प्रचाराचे मैदान दणाणून सोडले आहे.नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार प्रेमलता दादाराव पारवे आणि सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी, फायरब्रँड नेत्या आमदार सना मलिक यांनी आज शहरात पायी रॅली आणि वादळी कॉर्नर सभांचा झंझावात उभा केला.
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आ.सना मलिक यांचे पायी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता पारवे, नगरसेवक पदाचे उमेदवार फारुख पटेल, प्रिया डोईफोडे, शेख निजाम, महेश धांडे, अशपाक इनामदार, बिलाल शेख, मोमीन जकियोद्दीन, जैतुल्ला खान, सादेकुजमा,गोडसे मिना मनोज, मोमीन जुबेर, हाफिज अश्फाक यांच्यासह शेख तय्यबभाई, शेख मुजीबभाई, शेख जमीलमामू, अलीम पटेल, शेख शकील, शेख इम्रान, आवेज इनामदार, शेख फहीम, ॲड. सय्यद खाजा, कुस्तीपटू अल्फिया शेख आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे अनेक प्रमुख नेते व कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून उपस्थित होते. सायंकाळी 4 ते 5 या वेळेत प्रभाग क्र.6 मध्ये आमदार सना मलिक यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठी पायी रॅली काढण्यात आली. कारंजा टॉवर येथून निघालेल्या या पायी वादळाने अजिजपुरा, किल्ला मैदान, बलभीम चौक, कारंजा आणि जुना बाजार पर्यंतचा परिसर अक्षरशः घड्याळमय करून टाकला. रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या नागरिकांनी आमदार मलिक यांचे जोरदार स्वागत झाले. रॅलीच्या माध्यमातून त्यांनी लाखो मतदारांचे काळीज जिंकले. कॉर्नर सभांमधून विरोधकांना सडेतोड आव्हान देण्यात आले. पायी रॅलीनंतर आमदार सना मलिक यांनी थेट मतदारांशी संवाद साधत विरोधकांच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. मोमीनपुरा येथील सभेत देखील उत्साहाचे वातावरण होते. आ. मलिक यांनी प्रेमलता दादाराव पारवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. विजयी पॅनलसाठी प्रमुख कार्यकर्त्यांची मोट बांधली आहे.आमदार सना मलिक यांनी बीडमध्ये परिवर्तनाची हाक दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांचे पारडे जड झाले आहे.















