गेवराई प्रतिनिधी ः- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित विकासाभिमुख भुमिका गेवराई शहरासह तालुक्यातील जनतेच्या लक्षात आलेले आहे. रस्ते, पाणी आणि इतर मुलभूत सुविधांच्या विकासासाठी अमरसिंह पंडित यांनी आत्तापर्यंत मोठी कामगिरी केलेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता काम करणारअसून भाजपच्या विद्यमान नेतृत्वाने आमचा विश्वासघात केला आहे. गेवराई शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सर्व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन भाजपाचे कट्टर समर्थक भास्कर खडके यांनी केले. भास्कर खडके यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला यावेळी ते बोलत होते.
गेवराई शहरातील प्रभाग क्र.४ इस्लामपूरा येथील भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते हबीबभाई पठाण यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी बोलताना हबीबभाई म्हणाले की, भाजपाच्या विद्यमान नेतृत्वाने आमची दिशाभूल केली. मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले, मात्र कसल्याही प्रकारचा दुजाभाव न करता अमरसिंह पंडित यांनी मुस्लिम समाजासाठी गेवराई शहरात शादीखाना उभारला, कब्रस्थानांना संरक्षण भिंती बांधल्या हे काम अतिशय मोलाचे आहे. शिवछत्र परिवाराशिवाय कोणीही विकासाचे कामे करू शकणार नाही, त्यामुळे गेवराई नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवछत्र परिवाराचे हात बळकत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, दादासाहेब घोडके, शाहरूख पठाण, माजी सभापती मुजीब पठाण, मंजुर बागवान, राजू पठाण, समीर पठाण, साजेदभाई, अखिलभाई, अफसरभाई, शेरखान, ताहेरखान, सनाउल्ला पठाण, फारुकभाई, अदनान शेख, शहाबाजभाई, अन्सारखान पठाण, वाजेदभाई, रहीमभाई, सलमान पठाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()














