लस संपुर्णपणे सुरक्षित-डॉ.परमेश्वर बडे*
अंमळनेर दि.8(प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन हतबल झाले असुन रुग्ण संख्या कमी करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याने लसीकरण करण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करित असल्याचे दिसुन येत आहे. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात १३०० जणांचे लसीकरण करण्यात आले आले असुन देण्यात येणारी लस ही संपुर्णपणे सुरक्षित आहे,४५ वर्षावरील सर्वांनी लस घ्यावी असे अवाहन अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी परमेश्वर बडे यांनी केले आहे.
अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चिखली,कोतन, आणि पिंपळवंडी हे तीन उपकेंद्र येतात. रविवारी आणि मंगळवारी अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात येते तर उपकेंद्र कोतन येथे बुधवारी आणि गुरुवारी उपकेंद्र चिखली याठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. अद्यापर्यंत अंमळनेर प्रा.आरोग्य केंद्रांतर्गत १३०० नागरिकांनी लस घेतली आहे. लसीकरण करण्यापूर्वी उपकेंद्रांतील गावामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यामाध्यमातुन एक दिवस अगोदर दवंडी देऊन जणजागरण करण्यात येते , त्यामुळे गावातील जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील नागरिकांनी लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र दिसत आहे. लसीकरण करुन कोराना आजारावर आपण मात करुत अशा विश्वास कोतनचे सरपंच महेश खेंगरे यांनी व्यक्त केला. तर आरोग्य यंत्रणेला लसीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत सर्वोतपरी सहकार्य करीत असल्याचे ग्रामसेवक हरिश्चंद्र पवार यांनी सांगितले.
लसीकरण यशस्वी करण्यासाठी जिल्हा वैद्यकीय अधिकारी राधाकिसन पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी परमेश्वर बडे,सुपरवायझर नेटके एस.एस.,गव्हाणे एस.एस.,सिस्टर गायके,जाधव,पवार, सानप,ढाकणे,तसेच सदगर,ससाने,पवार, भोये,गाडे, सि.एच.ओ.शेख अमरिन,शेख हैदर,कुरील करुना,आदी परिश्रम घेत आहेत.कोतन उपकेंद्रांतील लसीकरणावेळी सरपंच महेश खेंगरे,अशोक जेधे,केंद्रप्रमुख अशोक पवार, दहिफळे सर, वारे सर, शिवाजी घोशीर,दिलीप घोशीर, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरण करण्यासाठी गावच्या सहकार्याने जेष्ठ व ४५ वरील नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. आम्हाला दिलेले उदिष्ट संपुर्णपणे पुर्ण करुन बीड जिल्हा्यात कोरोनाचा होणार प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.लस ही संपुर्णपणे सुरक्षित असुन लसीकरण करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे.
परमेश्वर बडे ,वैद्यकीय अधिकारी अंमळनेर