प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद
गेवराई प्रतिनिधी : गेवराई नगरपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे जड झाले असून पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ शितलताई दाभाडे, प्रभाग सहा मधील उमेदवार श्रीमती जाकेरा बेगम इस्माईल शरीफ व श्रीमती वैशाली किशोर कांडेकर यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन गेवराई शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
गेवराई नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सहा मध्ये सकाळी दहा वाजता प्रचार फेरीला सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित व गेवराई तालुक्याचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ .शितलताई महेश दाभाडे व प्रभाग क्रमांक सहा मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलाउमेदवार जाकेरा बेगम इस्माईल शरीफ व वैशाली किशोर कांडेकर यांच्या प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ही प्रचार फेरी मोमीनपुरा, खडकपुरा, भीमनगर या परिसरामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेत पूर्ण झाली. यावेळी या भागातील मुस्लिम मतदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या भागातील मुस्लिम मतदारांनी नाली रस्ता व दिवाबत्ती यासारखे प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासहित सर्व उमेदवारांना विजय करण्याचा निर्धार केला.
प्रचार फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या सुनीता कांडेकर, कमल सौंदरमल, मीना कांडेकर, ज्योती पोटफोडे, आशा पोटफोडे, सोजर पोटफोडे, स्वाती शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दीपक निकाळाजे, बाळू माटे, अर्जुन पोटफोडे, ॲड. गौतम कांडेकर, बाळासाहेब माटे, धनंजय कांडेकर, भीमा सौंदरमल, बंटी सौंदरमल, अशोक पाटेकर, धम्मा भोले प्रकाश साळवी, जीवन साळवी, सचिन माटे, शेख मोमीन गफार, शेख मुव्हीज, जब्बार काझी, अखिल नजीर, शेख नदीम, मोमीन इमरान, रईस मोमीन, ज्योती बाबू, हसमी रहमान, अब्दुल ढोराज, अब्दुल जब्बर, ढोराज हसनुद्दीन, शेख मोमीन, शाकीर मोमीन, अखिल सय्यद, आसमान मलिक, सय्यद आरिफ, सय्यद पैजाम, शेठ जुनेद, मोसिन सय्यद, समीर सय्यद, इस्माईल सय्यद, अब्दुल्ला कादर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















