बीड (प्रतिनिधि) :- सध्या राज्यासह बीड मध्ये कोरोना थैमान घालत घालताना दिसत आहे. म्हनून बीड येथील जिल्हाधिकारी यांना बीड मधील रेल्वे स्थानकातून समुद्र किनार पट्टी दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला जिल्हा रुग्णालयाचा कारभार श्री. गित्ते यांच्या कडे दिल्यापासून जिल्हा भर कोरोना रूग्ण वाढताना दिसत आहेत म्हणजे गृह विभागाचे १०० कोटीचे टार्गेट गित्ते यांनाच दिलंय की काय असा प्रश्न या वेळी भाजपाचे युवा नेते संभाजी सुर्वे यांनी उपस्थित केला आहे.
या वेळी पुढे निवेदनात असे नमूद केले आहे की, बीड जिल्हा रुग्णालयात डॉ. अशोक थोरात साहेब हे शैल्य चिकित्सक आस्तानी वेळोवेळी नागरिकांशी संवाद साधून कोरोणा विषयी माहिती देत असत व त्यापासून न भिता काळजी घ्या मास्कचा वापर करा या सर्व सूचना वेळोवेळी देत होते आणि विशेष म्हणजे त्यांच्या काळात रुग्ण हे जास्त प्रमाणात योग्य ती सेवा मिळाल्या कारणांमुळे बरे होऊन घरी जाणाऱ्यांच्या आकडा जास्त होता. त्या मुळे जिल्हयातील नागरिक हे भय मुक्त होऊन जिम्मेदारी ने कोरोणा पासुन स्वतहाचा बचाव करायचे. परंतु जेव्हा पासून हे गित्ते महाशय त्या ठिकाणी आले आहेत तेव्हां पासून सर्व आरोग्य यंत्रणेचा फज्जा उडाला आहे. कोणाचाच कोणाला ताळमेळ राहिला नाही. शाकीय रुग्णालयातील औषधांचा काळा बाजार होत असल्याची चर्चा देखिल रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये पहावयास मिळत आहे. म्हनून जर का हा जोरात वाढत असलेल्या कोरोनाला ब्रेक लावायचा असेल तर बीड जिल्हा रुग्णालयात डॉ. थोरातच हवेत असे स्पष्ट मत भाजपा युवा नेते संभाजी सुर्वे मांडले आहे. म्हनून पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी याची गांभीर्य पूर्ण दखल घेऊन जिल्ह्याचा अनुभव आसलेल्या डॉ. अशोक थोरात यांना परत बीड जिल्हा रुग्णालयात शैल्य चिकित्सक म्हनून पुन्हा नियुक्त करावे अन्यथा जिल्ह्यात कोरोणा आणखी बळ धरेल अशी चिन्ह दिसत आहेत अस मत संभाजी सुर्वे यांनी वेक्त केले आहे.