परळी वैजनाथ : आॅगस्ट आणि सप्टेंबर २०२५ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीकाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देवून शेतकऱ्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंञी ना.पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तालुक्यातील पीक नुकसानीचे सुमारे ४८ कोटी ३३ लाख रुपये सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत.
यावर्षीच्या ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात सगळीकडेच अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला.
मुसळधार पावसामुळे शेतातील उभ्या पिकांत पावसाचे पाणी साचले तर अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले. या सर्व नुकसानीची दखल घेवून राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी ३१ हजार कोटीचे पॅकेज जाहीर करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. ना.पंकजाताई मुंडे यांनी बीड व जालना जिल्ह्याचा दौरा करुन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले होते.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात परळी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांच्या नुकसान भरपाई पोटी ५४ हजार शेतकऱ्यांना ४८ कोटी ३३ लाख रुपयाचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. शेतकरी संकटात असताना ऐन दिवाळीत सरकारने अनुदानाचे वाटप करुन त्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल ना.पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंञी एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे आभार मानले आहेत.