बीड प्रतिनिधी – येथील प्रसिध्द अस्थिरोगतज्ञ डॉ.प्रमोद शिंदे यांच्या सह्याद्री ऑर्थोकेअर हॉस्पीटल आणि सुषमा प्रमोद शिंदे यांच्या निरामय आयुर्वेद चिकित्सालयाचा बुधवार दि.22 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता नवीन वास्तूत स्थलांतर व शुभारंभ आयोजीत करण्यात आला आहे. या स्थलांतर व शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बीड येथील सह्याद्री ऑर्थोकेअर हॉस्पीटल आणि निरामय आयुर्वेद चिकित्सालयाचा हॉटेल अन्विता समोर औटी मंगल कार्यालय जालना रोड बीड येथे नवीन वास्तूत स्थलांतर व शुभारंभ होत आहे. दि.22 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता होणार्या शुभारंभ कार्यक्रमास श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.शिवाजी महाराज, चाकरवाडीचे ह.भ.प.महादेव महाराज यांचे आशिर्वाद लाभणार आहेत. माजी मंत्री शिवाजीरावदादा पंडित आणि नाशिक येथील प्रसिध्द अस्थिरोगतज्ञ डॉ.विजय काकतकर यांच्या हस्ते शुभारंभ होणार असून मनोजदादा जरांगे पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार बजरंग सोनवणे, जयदत्त अण्णा क्षीरसागर, आमदार सुरेश आण्णा धस आमदार संदीप भैय्या क्षीरसागर, आमदार विजयराजे पंडित, आमदार प्रकाश दादा सोळंके, तसेच अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत,या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन डॉ.प्रमोद शिंदे, डॉ.सुषमा शिंदे यांनी केले आहे.

















