बीड प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात असताना भरीव मदतीची अपेक्षा होती. परंतु सरकारने तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले. जाहीर केलेली नुकसान भरपाई
अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पडली नाही. जी काय मदत आहे ती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. राजकीय भूमिकेमुळे फायदा ही होतो.आणि तोटाही होतो. विकास निधीसाठी संघर्ष करावा लागतोय. ही वेळ ही जाणार आहे.नियती कोणाला माफ करत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष ताकतीनिशी उतरणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीत 100% संपादन करून स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेऊन लोकसंख्या निहाय आपल्या हक्काचा विकास निधी खेचून आणू. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी श्रीक्षेत्र बेलेश्वर येथे आयोजित लिंबागणेश पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले आहे.
आज श्रीक्षेत्र बेलेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने लिंबागणेश पंचायत समिती गणाची बैठक आणि दीपावली स्नेहमिलन व फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास
महंत महादेव महाराज,
हभप तुकाराम महाराज,
आमदार संदीप भैया क्षिरसागर, जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गणेश ढवळे यांची प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाल. या बैठकीस
आ.संदीपभैया क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,
यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी परिसरातील विकास कामाबाबत मार्गदर्शन केले.
लिंबागणेश पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असून उमेदवारांची चाचणी करण्यात आली.
या बैठकीसाठी लिंबागणेश पंचायत समिती गणातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, चेअरमन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते