बीड: बीड जिल्ह्यात सलग तीन दिवस अतिवृष्टी झाली. नद्यांना आलेल्या पुराने पात्र सोडले असून आता पिकात पाणी आहेच पण अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. विद्यूत पोल पडले आहेत. घरांची भिंतीही ढासळल्या असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे दादा, सरकारकडून तातडीने मदत द्या, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठकीत केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे दि.१६ रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून सांयकाळी ६.३० जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे जिल्ह्यातील पूर व पीक परिस्थिती आढावा बैठक त्यांनी घेतली. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविधि खातेप्रमूखांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, बीड जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवर मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीचे मोठे संकट कोसळले आहे. दि.१३ व १४ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पर्जन्यमानाची नोंद झाली असून जिल्ह्यातील १५ महसूल मंडळे अतिवृष्टीग्रस्त ठरली आहेत. त्यानंतर कालच्या मागील २४ तासांत पुन्हा एकदा सरासरी ३६.७ मि.मी.पर्जन्यमान झाले आहे. त्यातही १५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात सरासरी ५६६.१ मि.मी. पर्जन्यमान होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६२०.६ मि.मी.इतका पाऊस झाल्याने मान्सून सरासरीच्या १०९ टक्के इतके पर्जन्यमान झाले आहे. हा पाऊस जिल्ह्यात अत्यंत असमान व अतिवृष्टीच्या स्वरूपात झाल्याने शेती, पशुधन व मानवी वसाहतींवर अतोनात संकट आले आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तुर आदी सर्व प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांची दुभती जनावरे व गुरेढोरे दगावली आहेत. ज्यामुळे त्यांचा उत्पन्नाचा आधार पूर्णपणे ढासळला आहे.राहती घरे पडल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली असून रस्त्यावर आली आहेत, घरामध्ये साठवलेले धान्य, वियाणे, औषधे व जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतातील सुपीक माती वाहून गेलो असून जमीन पिकवण्यायोग्य राहिली नाही. या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक संकट आले आहे. शेतकरी ज्यांच्या श्रमावर आपले जीवन व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात ते आज पूर्णपणे कोसळले आहेत, हा केवळ नैसर्गिक आपत्तीचा प्रश्न नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वावर आलेले गंभीर संकट आहे. म्हणूनच, जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना त्वरित दिलासा मिळावा यासाठी शासनाने नुकसानग्रस्त भागात तात्काळ व अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय नुकसान भरपाई द्यावी. पिकांचे नुकसान, जनावरांच्या मृत्यू, घरांचे पडणे व धान्याचे वाहून जाणे या सर्वांचा वेगळ्या-वेगळ्या गटांमध्ये सविस्तर अहवाल तयार करून त्यानुसार मदत द्यावी, शेतकऱ्यांना व नागरिकांना त्वरित आर्थिक मदत मिळावी यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अतिवृष्टीमुळे जमीन नापीक झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पैकेज जाहीर करावे. जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे पाझर तलाव फुटुन त्याखालील परिसराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बेघर झालेल्या कुटुंबांसाठी तात्पुरती निवारा व्यवस्था तसेच घरकुल योजना राबवून त्यांचे पुनर्वसन करावे. पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना विशेष अनुदान व विमा संरक्षण तातडीने द्यावे, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली. यावेळी पालकमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.