विनायकराव मेटे यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू
निष्ठा काय चीज असते ती पाहायच असेल तर त्यांनी मेटे साहेबांच्या शिवसंग्रामला पहावे – डॉ. ज्योती मेटे
सुप्रद्धी ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी वाहिली श्रद्धांजली
निष्ठावंत शिवसंग्राम कार्यकर्त्यांना पाच लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच
मुंबई (प्रतिनिधी) शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांची जयंती भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे दि. १३ जुलै रविवार रोजी दुपारी ०४:०० वाजता मुंबई शिवसंग्रामच्या वतीने साजरी करण्यात आली.”आठवणीतील मेटे साहेब” या अभिवादन कार्यक्रमास अनेक मान्यवरांसह प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी आणि सुप्रसिद्ध ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी विनायकराव मेटे यांच्या आठवणींना उजाळा दिला तर शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांचे पहिल्यांदाच आक्रमक भाषण ऐकायला मिळाले.
आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत मोलमजुरी करण्यासाठी बीड जिल्ह्यातून आलेले विनायकराव मेटे हे सलग पाच वेळा आमदार होतील असे स्वप्नात ही वाटत नव्हते नुसते आमदारच नाही तर त्यांनी शिवसंग्राम संघटना स्थापन करून उभ्या महाराष्ट्रात आपल्या कार्यकर्त्यांची फौज तयार केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला मराठा, धनगर , मुस्लिम आरक्षण , शिवस्मारक , आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, शेतकरी पेन्शन योजना, व्यसनमुक्ती अभियान यासारख्या अनेक गोष्टीवर काम करत असताना त्यांनी आपल्या नावाचे एक वेगळे वलय निर्माण केले होते. मराठा आरक्षणावर विधिमंडळात आणि न्यायालयात त्यांची मोठी योगदान होते. परंतु या अद्वितीय नेत्याच्या जाण्याने आज त्यांची जयंती साजरी करण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्या सर्व हितचिंतकांवर आली आहे. आज आपल्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबई सह महाराष्ट्रातून असंख्य चाहत्यांनी वडाळा येथील भारतीय क्रीडा मंडळ परिसरात मोठी गर्दी केली होती.यावेळी मंचावर उपस्थित मा. आयएएस. अधिकारी श्री. निर्मलकुमार देशमुख, मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता श्री.नवनाथ घाडगे, सेवानिवृत्त मुख्य अभियंता श्री. पी. वाय. देशमुख, जागतिक कीर्तीचे स्त्री रोग तज्ञ डॉ.प्रवीण म्हात्रे ,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे श्री. प्रमोद हिंदूराव, शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष श्री. प्रभाकर कोलंगडे ,शेखर पवार, मीरा-भाईंदरचे नगरसेवक श्री.अनिल भोसले,श्री. संजय सिंघन आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवसंग्रामचे ज्येष्ठ नेते नारायणराव काशीद यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश विचारे यांनी केले.
मुंबई शिवसंग्रामच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या अभिवादन कार्यक्रमास नेहमी शांत आणि संयमी पहावयास मिळालेल्या शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे कमालीच्या आक्रमक पहावयास मिळाल्या लोकनेते विनायकराव मेटे यांच्या आठवणींना उजाळा देत असतानाच त्यांनी शिवसंग्रामच्या मावळ्यांना खचून न जाता धैर्याने लढा असा संदेश दिला त्याचबरोबर जर कोणाला निष्ठा काय चीज असते ती पाहायच असेल तर त्यांनी मेटे साहेबांची शिवसंग्रामला पाहायला हवी या निष्ठे बद्दल आणि माझ्यावर विश्वास ठेवल्या बद्दल मी तुम्हला सर्वाना सलाम करते. आणि याच निष्ठावंत कार्यकर्त्यांना जपण्यासाठी आज गतवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील आपण शिवसंग्रामच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा विमा उतरवला आहे.
मेटे साहेबांच्या आरक्षण लढ्यात मी त्यांची साक्षीदार राहिली आहे. आरक्षणविषयक कायदेशीर बाबींवर नेहमी त्यांच्याशी चर्चा व्हायची मराठा आरक्षण न्यायालय त्यांचे मोठे योगदान होते आणि ज्या ज्या वेळी मेटे साहेबांना मदत लागायची त्यावेळी पडद्यामागून मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असायचे मेटे साहेब काम करताना त्यांचा वैयक्तिक हेतू काही नव्हता ज्या जातीत जन्मलो त्याला न्याय देण हे त्यांचे काम होत. मराठा आरक्षणावर बोलताना अनेकजण मेटे साहेबांच नाव टाळयचे फोटो येऊ द्यायचे नाहीत याने त्यांना काय सिद्ध करायचं आहे? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला साहेबांचा वसा आणि वारसा आपण पुढे घेऊन जातोय हे आपण ठामपणे सांगू शकतो. अवरीत विश्वासाने माझ्यावर जी धुरा तुम्ही दिली ती मी पेलायला मी सक्षम आहे. जयंती म्हणजे इतराना साधं सरळ असू शकत पण पत्नीला जयंती म्हणणं माझ्या वाट्याला यावं हे अत्यंत वाईट आहे. असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले.
प्रचंड गर्दी आणि सभागृह फुल
ज्या सभागृहात लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांना अभिवादन करण्यात येणार होते त्या ठिकाणी सकाळपासूनच चाहत्यांनी गर्दी केली होती कार्यक्रम सुरू झाला तेव्हा अक्षरशः सभागृह तुडुंब भरले होते आणि सभागृहाबाहेर देखील तितकाच जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी शिवसंग्राम ची मुंबईतील ताकद पहावयास मिळाली.
छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांची उपस्थिती
सुप्रद्धी ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या अभिवादन कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लावली यावेळी त्यांनी लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या प्रेमाखातर आज आपण इतर उपस्थित असल्याचे सांगितले. यावेळी उतेकर उपस्थित होताच संभाजी महाराजांच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले.