प्रारंभ वृत्तसेवा
बीड : माजलगाव मतदार संघाचे माजी आ. आर टी देशमुख यांच्या वाहनाचा आज सायंकाळी लातूर जिल्ह्यात अपघात झाला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते, उपचारासाठी त्यांना लातूर येथील हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे…