लिंबागणेश :- आज सकाळी लिंबागणेश परीसरातील मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील लिंबागणेश आणि महाजनवाडी शिवारात असलेल्या पवनचक्की रखवालदाराने दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री चोरी करण्याच्या उद्देशाने काही लाठ्या काठ्या धारी माणसं आली होती त्यामुळे रखवालदाराने केलेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला. सदरील ईसमाचे प्रेत जवळच्या महाजनवाडी शिवारातील झाडीत शेळ्या चारणा-या शेतकऱ्यांने पाहिले असता आरडाओरडा केला.सदरची माहिती ग्रामस्थांनी नेकनुर पोलिस स्टेशनचे प्रभारी चंद्रकांत गोसावी यांना कळवली. सपोनि चंद्रकांत गोसावी आणि त्यांची टीम घटना स्थळी दाखल झाली असुन स्थळपंचनामा आणि पुढील चौकशी सुरू आहे..