डॉ.ज्योती मेटे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रतिपादन
अभिष्टचिंतन सोहळ्यात शुभेच्छांचा वर्षाव
बीड प्रतिनिधी : लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या पत्नी आणि शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांचा वाढदिवस दि.१४ एप्रिल रोजी संपन्न झाला आज त्या बीडमध्ये आल्यानंतर त्यांच्या असंख्य चाहत्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. लोकनेते विनायकराव मेटे साहेबांची राजकीय आणि सामाजिक चळवळ समर्थपणे चालवणाऱ्या आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते हितचिंतक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती.
लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या निधनानंतर शिवसंग्रामची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या डॉ. ज्योती मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसंग्राम भवन येथे त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांसह शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना डॉ. ज्योती मेटे म्हणाल्या की, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले त्याचप्रमाणे लोकनेते विनायकराव मेटे साहेबांनी ज्यावेळी शिवसंग्राम ची स्थापना केली त्यावेळी त्यांच्यासोबत देखील अठरापगड जातीतील कार्यकर्ते सोबतीला होते आणि आज देखील या संघटनेमध्ये सर्व जाती-धर्मातील कार्यकर्ते शिवसंग्राम नेटाने पुढे नेत आहेत. जेव्हा तुमच्याकडे दिशादर्शक नेता हरवला होता त्यावेळी देखील आपण आपण उभे राहिलात त्यामुळे मला तेव्हा देखील आपला अभिमान होता आणि आज देखील अभिमान आहे आणि आपल्या जोरावरच येणाऱ्या काळात शिवसंग्राम खचणार नाही, संपणार नाही आणि थांबणार देखील नाही, जोमाने कामाला लागा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसंग्राम ताकतीनिशी लढणार असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.
याप्रसंगी शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे नारायणराव काशीद, नितीन शेठ कोटेचा, एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख शफिक भाऊ, शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष जाधव, अनिल घुमरे, सुहास पाटील, पत्रकार प्रमोद कुलकर्णी, रामदास नाईकवाडे, सचिन कोटूळे, पंडितराव माने, नामदेव गायकवाड, उत्तमराव पवार, सुनील कुटे ,प्रा. फाटक सर, ज्ञानेश पानसंबळ, मनीषाताई कुपकर, गुरसाळे महाराज, कुतुब भाई, विठ्ठलराव ढोकणे, राजेंद्र आमटे आदी सह शिवसंग्राम चे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका ह्या ज्योतीताई यांच्या नेतृत्वात आपल्याला सक्षमपणे लढायच्या आहेत आणि या वाढदिवसानिमित्त आपण संकल्प करून सर्व त्या दृष्टीने जोमाने कामाला लागू असे मत यावेळी शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी व्यक्त केले.
सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती आपलं स्वतःचं वलय निर्माण करतो आणि राजकीय पटलावर आपल्या नावाचा ठसा उमटवतो यामुळे मेटे साहेबां विषयी आपल्याला नितांत आधार वाटतो मेटे साहेबांचे कार्य ज्योतीताई पुढे घेऊन जात आहेत. मात्र ताई ह्या बीड जिल्ह्याला कळल्याच नाहीत आणि सरकारने देखील ज्योतीताईंना न्याय दिला पाहिजे असे मत यावेळेस एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शफीक भाऊ यांनी व्यक्त केले.