परळी वैजनाथ ।राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज शहरातील राजाभैय्या पांडे, पत्रकार रामप्रसाद शर्मा आणि जाधव परिवारातील सदस्यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व धीर दिला.
माजी नगरसेवक राजाभैय्या पांडे यांच्या मातोश्री सुनिती पांडे, पत्रकार रामप्रसाद शर्मा यांच्या मातोश्री फुलाबाई शर्मा व चिरंजीव गोपाल शर्मा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अर्चना रोडे यांचे बंधू प्रितम जाधव यांचे नुकतेच दुःखद निधन झाले होते. कुटुंबातील सदस्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आज ना. पंकजाताई मुंडे यांनी सर्वांच्या घरी जाऊन परिवाराचे सांत्वन केले व धीर दिला. यावेळी भाजपचे पदाधिकारी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.