बीड: बीड जिल्ह्यात दळण-वळणाची अधिक सोयीचे व्हावे, यासाठी खा.बजरंग सोनवणे हे रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या विषयावर चिकाटीने पाठपुरावा करत आहेत. दि.२७ रोजी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गातील अडथळे, समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी दोघांत रस्ते विकासाच्या मुद्दयावर तासभर सकारात्मक चर्चाही झाली.
खा.बजरंग सोनवणे यांनी या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या विषयात सभागृहात आवाज उठविला होता. दि. १८ मार्च रोजी मुंबई येथील राष्ट्रीय महामार्ग विभागीय कार्यालयात जिल्ह्यातील महामार्ग संबंधित सर्व अधिकारी यांची बैठक घेतली. इतक्यावर न थांबता त्यांनी दि.२७ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथील कार्यालयात जावून भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात बर्दापूर ते लोखंडी सावरगाव आणि अहमदपूर- पठाण मांडवा- अंबाजोगाई- लोखंडी सावरगाव- केज ते मांजरसुंबा हे दोन्ही रस्ते ४ पदरी दुहेरी वाहतुकीचे करणे. पिठ्ठी- अमळनेर- धामणगाव ते टाकळी काझी तसेच उमापूर फाटा- उमापूर ते शेवगाव हे राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गामधे दर्जोन्नत करणे. खरवंडी ते नवगण राजुरी हा राष्ट्रीय महामार्ग लवकर पूर्ण करणे तसेच या कामाच्या दर्जाबाबतच्या तक्रारी लक्षात घेऊन जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांचेवर कारवाई करणे. शेगाव ते पंढरपूर रस्ता धारुर घाटातील रुंदीकरण व चढण कमी करण्याच्या प्रस्तावास मान्यता देणे, अशा मागण्याची निवेदने सादर करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खा.बजरंग सोनवणे यांच्याकडून जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची स्थिती, सुरू असलेल्या कामांचा आढावाही घेतला. शिवाय राष्ट्रीय महामार्गाच्या कामात येणाऱ्या प्रशासकीय व तांत्रिक अडथळ्यांबाबतही सकारात्मक चर्चा केली. राज्यमार्ग दर्जोन्नतीसाठी प्रस्ताव मागऊन घेऊन कार्यवाही करण्यात येईल तसेच राष्ट्रीय महामार्गातील समस्यांचे निराकरण करू, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.