एकाच सरणावर आठही जणांना अग्निडाग देण्यात आला
अंबाजोगाई तालुक्यातील घटना; जिल्ह्याची नाजूक परिस्थिती
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : अंबाजोगाई तालुक्यात आज (ता. ०६) कोरोनाने सहा जणांचा बळी घेतला. या आठ ही जणांना एकाच सरणावर अग्निडाग देण्यात आला.
अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालय व लोखंडीच्या कोव्हिड सेंटर मध्ये परळी, केज, धारुर, गंगाखेड यासह इतर ठिकणांचे रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. मंगळवार पेठ, भटगल्ली, बोरखेड (परळी), लोखंडी दावारागाव, अंबलटेक, आपेगाव, मंगरुळ व धारुर येथील आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मृत रुग्णांवर मंगळवारी दुपारी पठाण मांडवा येथील स्मशानभुमित अग्निडाग देण्यात आला. या घटनेने जिल्ह्यात मोठी चिंता वाढली आहे.