मनोजदादा जरांगे यांची शिवाजीराव पंडित यांनी घेतली भेट
गेवराई प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी लढणारे संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांची माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. मराठा आरक्षणाशिवाय मराठा समाजाचा उद्धार होऊ शकत नाही, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी जो लढा उभारला तो योग्यच आहे. आपण आणि शिवछत्र परिवर मराठा आरक्षणासाठी आग्रही राहीलो. यापुढील काळात आपण मनोज जरांगे यांच्या सोबतच राहू असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी केले.
माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांनी आज संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. आपण तब्येत सांभाळावी, मराठा समाजाला आपली गरज आहे. तुमच्या छायेखाली मराठा समाज एक झाला असून ही वज्रमूठ आता कोणीही रोखू शकत नाही. मराठा आरक्षणासाठी आपण कायम रस्त्यावर उतरलो. या वयातही आपण मराठा आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष केला. यापुढील काळात मराठा आरक्षणासाठी आपण कायम मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी त्यांच्या सोबत जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.