थोड्याच वेळात वाल्मीक कराडला केज कोर्टात हजर करण्यात येणार
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असलेला वाल्मीक कराडची आज 14 दिवसाची सीआयडी कोठडीची मुदत संपत असल्याने कराडला आज केज न्यायालयात थोड्याच वेळात हजर करण्यात येणार आहे. कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर कराडच्या आईने धरणे आंदोलन सुरू केला आहे. माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी कराडच्या आईंची आहे.