बीड: विघनवाडी- नवगण राजुरीपर्यंत जलदगती रेल्वेची चाचणी घेतल्यानंतर दि.३१ डिसेंबर रोजी खा.बजरंग सोनवणे यांनी सलग चार तास रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मॅरेथॉन बैठक घेतली. यावेळी रेल्वे भुसंपादणाचे विषय तातडीने मार्गी लावा, राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा दर्जा राखा असे आदेशही अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, २६ जानेवारीपर्यंत बीडला रेल्वे येईल, यासाठी प्रयत्न करा, अशा सुचनाही खा.सोनवणे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १०.३० वाजता रेल्वे विभागाच्या बैठकीला सुरूवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, रेल्वे विभागाचे अधिकारी लोळगे, उपजिल्हाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी घाटनांदुर ता.अंबाजोगाई या ठिकाणी मंत्रीमहोदयांच्या आदेशानुसार अतिजलदगती गाड्यांना थांबा देण्यासाठी कार्यवाही करा, दि.२६ जानेवारी २०२५ पासून बीड-अहमदनगर रेल्वे नियमित सुरु करणे बाबत प्रयत्न करा, अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाकरिता रायमोह व धनगरवाडी येथील संपादीत झालेल्या जमिनीचा मावेजा मिळणे करीता मा. उपविभागीय अधिकारी, पाटोदा यांना सुचित करा, काकडहिरा या गावातील रेल्वेच्या कामामुळे शेतात जाण्याचा रस्ता बंद झाला आहे, तो रस्ता दुरुस्त करण्यात यावा. काकडवाडी (पिंपळा) ता.आष्टी येथील पुलाचे काम तातडीने करावे असे आदेश देण्यात आले, पिठ्ठठी-धामनगांव-टाकळीकाजी या रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव पाठवा, राक्षसभुवन फाटा-उमापुर-शेषगाव या रस्त्यास महामार्गाचा दर्जा देणे बाबत प्रस्ताव पाठवा,
कळंब पुलाजवळचे काम तात्काळ सुरु करावे, महामार्ग क्र. ५४८ या रस्त्यावर नेकनुर या ठिकाणी स्पिड ब्रेकर बसविण्याकरिता संबंधितास आदेशित करण्यात यावे,अंबाजोगाई-केज-नेकनुर-पाटो
००
खा.सोनवणे म्हणाले, चर्चा नको, काम दाखवा
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विभागातील आढावा घेत असताना, अर्धवट कामे, कामाचा ढासळलेला दर्जा, या बाबत खा.बजरंग सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळू नका, असे म्हणत रखडलेले कामे तात्काळ सुरू करण्या संदर्भात सूचना केल्या. रेल्वे विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाचा संदर्भात आलेल्या सर्व तक्रारी मार्गी लावा, असेही ते म्हणाले.
रखडलेली कामे सुरू करा
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची बहूतेक कामे रखडली आहेत. यात पैठण-पंढरपूर, खरवंडी-नवगण राजूरी, अहमदपूर-चुंबळी, परतूर-बार्शी, लातूर-पाथरी, अहमदनगर- बीड-परळी, गंगाखेड, खरवंडी कासार- पाडळसिंगी या रस्त्यांचा समावेश आहे. सदरील कामे येत्या काळात तत्काळ पुर्ण करा, जिल्ह्यातील नागरिकांच्या जिवीताशी खेळू नका, अशा सुचनाही खा.सोनवणे यांनी दिल्या. केज शहरातुन जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या थांबलेल्या कामांची गती वाढवून ते कामे गतीने कामे पुर्ण करणार आणि धारुर घाटातील रुंदीकरणाचे तसेच उर्वरित काम वेगाने पूर्ण करुन घेणार, असेही ते म्हणाले.