मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांची अधिवेशनात माहिती
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुण खून करण्यात आल्यानंतर याचे पडसाद राज्यभर उमटले. अधिवेशनामध्ये गेल्या चार दिवसापासून हा प्रश्न गाजत असताना या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपीस सह जो कोणी मास्टरमाईंड असेल त्याला सोडणार नाही. मग तो कोणत्याही पक्षाचा असो असं मत व्यक्त केलं यानंतर हलगर्जीपणा करणाऱ्या एसपींना सुद्धा याप्रकरणी बदलण्यात येईल असं सुद्धा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी मस्साजोग खून प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले. यामध्ये वाल्मीक कराड जरी असले तरी त्यांना सुद्धा त्यांना सोडणार नाही असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.