आष्टी (प्रतिनिधी) मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक झालीच पाहिजे संबंधित प्रकरणातील शागीर्द,त्यांचे पाठीराखे,आणि सूत्रधार (आका) यांना देखील अटक झालीच पाहिजे अशा घोषणा देत हातात फलक घेत आष्टी शहरातून बुधवारी सायंकाळी समाज,आ.सुरेश धस मित्र मंडळ आणि आष्टी शहर तसेच परिसरातील नागरिकांच्या वतीने कँडल मार्च काढत सरपंच हत्येच्या घटनेचा निषेध केला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील काही आरोपींना अजूनही अटक झाली नाही उर्वरित त्या सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे तसेच त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी या मागणीचे हातात फलक घेऊन आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक,शनी चौक,कमानवेस,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,बस स्टँड,महात्मा फुले चौक,महावीर चौक,अण्णाभाऊ साठे चौक,स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या कँडल मार्चची सांगता झाली.यावेळी लहान मुलांसह शहरातील आणि परिसरातील युवक वर्ग,ज्येष्ठ नागरिक,व्यापारी,पदाधिकारी मोठ्या संख्येने या कँडल मार्च मध्ये सहभागी झाले होते.