कुठल्याही स्तरावर पैशांची मागणी झाल्यास तक्रार करण्याचेही आवाहन
बीड प्रतिनिधी :- रमाई आवास घरकुल योजनेसाठी समाजकल्याण विभागाकडून नवीन उद्दीष्ट प्राप्त झाले असून निकषांची पुर्तता करणार्या लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
रमाई आवास योजना (ग्रामीण) या अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील लोकांसाठी असलेल्या घरकुल योजनेसाठी समाजकल्याण विभागाकडून बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील बीड तालुक्यासाठी ७२० व शिरूर-कासार तालुक्यासाठी २४० इतके उद्दीष्टांना मंजुरी दिली आहे. याअनुषंगाने समाजकल्याण विभागाकडून पंचायत समितीमार्फत निकष पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज, प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यामुळे निकषांची पुरवण्या करणार्या अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र लाभार्थी यांनी आपले अर्ज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सदरील योजनेसाठी दाखल करावेत असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
पैशांची मागणी झाल्यास संपर्क करा
दरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी रमाई आवास योजनेच्या प्रक्रियेत कुठल्याही स्तरावर पैशांची मागणी किंवा आर्थिक गैरव्यवहार झाल्यास मो.नं.९७६६२७२७२४, ९३७३६०३११९ या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.