अखिल भारतीय मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड नंतर विनोद पाटलांनी ही जाहीर केला पाठिंबा
विनायकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी या ज्योतीला संधी द्या – डॉ. ज्योती मेटे
बीड (प्रतिनिधी) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी बीडमध्ये चांगलेच शक्ती प्रदर्शन केले. बार्शी नाका ते नगर नाका अशी भव्य रॅली त्यांनी काढली रॅलीचा समारोप शिवसंग्राम भवन येथे विराट सभा घेऊन करण्यात आला. लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांच्या जोरावर मी विजयी होणार याची मला खात्री आहे. असे प्रतिपादन त्यांनी या सभेत केले यावेळी मंचावर शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, सलीम पटेल, शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद , अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब सोळुंके, बालघाटवरील मराठा सेवक बळवंत कदम, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, बीड विधानसभा प्रभारी सुभाष जाधव , सुनील शिंदे, जकी सौदागर, आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण बीड मतदारसंघात दौरा करताना लोकांनी आणि माय माऊल्यानी अत्यंत उत्साहात स्वागत केले. त्यांचा उत्साह हा मतदानाचा दिवशी मतपेटीतून देखील दिसणार आहे. लोकनेते विनायकराव मेटे साहेबांचा वसा आणि वारसा ज्योती मेटे पुढे घेऊन जात आहे. हे लोकांच्या मनाला जास्त भावले आहे. माझी पाटी कोरी असल्याने माझ्याबद्दल बोलण्यासारखे काहीच नसल्याने विरोधकांनी जाणीवपूर्वक षडयंत्र रचून माझ्यावर आरोप करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना मी एकच सांगू इच्छिते कमरेखाली वार करण्यापेक्षा समोरासमोर लढा मी महिला असले तरी कमजोर नाही. असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
चौकट
अखिल भारतीय मराठा महासंघ संभाजी, ब्रिगेड नंतर विनोद पाटलांनी ही जाहीर केला पाठिंबा
डॉ.ज्योती मेटे यांना काल अखिल भारतीय मराठा महासंघ आणि संभाजी ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दर्शवल्यानंतर मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा लढणारे मराठा सेवक विनोद पाटील यांनी देखील बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉ. ज्योती मेटे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. लोकनेते विनायकराव मेटे साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण हा पाठिंबा देत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
विनायकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी या ज्योतीला संधी द्या – डॉ. ज्योती मेटे
प्रचार दरम्यान मतदाराला साद घालताना विनायकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी या ज्योतीला संधी द्या असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले यावेळी बोलत असताना डॉ. ज्योती मेटे या भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले आपल्या भाषणादरम्यान नेत्याला भाऊक झाल्याचे पाहून उपस्थितांचे डोळे देखील पाणवले.