बीड (प्रतिनिधी) बीड मतदार संघाच्या उज्वल भवितव्यासाठी आणि नवी दिशा देण्यासाठी उच्च शिक्षित , उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांना क्रमंक १९ बॅटरी टॉर्च चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी केले आहे.
बीड मतदार संघ सत्ताधाऱ्यांनी अंधकारात लोटला आहे. विकासच्या नुसत्या गप्पा मारल्या जातात मात्र ज्यांच्या हाती गेली अनेक वर्ष सत्ता आहे . त्यांनी बीडचा विकास का केला नाही. इथून मागे दिलेल्या संधी चे सोने करता आले नाही तर पुढे काय करणार आता मतदारांचा यांच्या आश्वासनावर विश्वास राहिला नाही. या करिता बीड मतदार संघातील मतदार आता आश्वासक चेहरा असलेल्या डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहेत. गाव खेड्यात डॉ. ज्योती मेटे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तर शहरी भागातील सुजाण नागरिक देखील डॉ. ज्योती मेटे यांच्या सोबत आहेत. तेव्हा जर बीड मतदार संघाला अंधकरातून प्रकाशा कडे न्यायचे असेल तर डॉ. ज्योती मेटे यांच्या बॅटरी टॉर्च या चिन्ह समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी केले आहे.