आष्टी मतदार संघाच्या उज्वल भवितव्यासाठी सुरेश धस विजयी होणे आवश्यक – साहेबराव दरेकर
सुरेश धस यांच्या गटनिहाय हाऊसफुल कॉर्नर बैठक
आष्टी प्रतिनिधी : आष्टी,पाटोदा शिरूर कासार या विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे या निवडणुकीतील एक उमेदवार हे माझे हक्काचे मतदान कमी व्हावे या हेतूने निवडणूक लढवीत असल्याने या
” वोट कटवा ” भूमिकेतील उमेदवारास मतदान करून आपले मत वाया घालू नका असे प्रतिपादन भाजपा शिवसेना रिपाई आणि मित्रपक्ष या युतीचे उमेदवार माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी केले
लोणी येथील प्रचार जाहीर सभेत ते बोलत होते
ते पुढे म्हणाले की,मी भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानुसार मला भाजपातर्फे उमेदवारी मिळालेली आहे मात्र अपक्ष फॉर्म भरलेले उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत मागील दहा वर्षात निष्क्रिय राजकारण करणाऱ्या या अपक्ष उमेदवाराला मते मिळणार नाहीत त्याच बरोबर इतर दोन उमेदवार राजकीय पक्षांचे आहेत परंतु त्यांची तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी लढत आहे त्यामुळे मला मिळणारी हक्काची मते कमी व्हावी त्या उद्देशाने निवडणूक लढवणाऱ्या “वोट कटवा ” भूमिकेतील उमेदवाराला मत दिल्यास अपक्ष उमेदवाराला त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे विचारवंत मतदारांनी अत्यंत विचारपूर्वक मला मतदान करावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले की,
मी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षात गेली 40 वर्षे काम करत आहे.2009 च्या निवडणुकीमध्ये मी सुरेश धस यांना आमदार केले 2014 च्या निवडणुकीत भीमराव धोंडे यांना पाठिंबा देऊन त्यांना विजयी केले आणि 2019 ला बाळासाहेब आजबे यांना संपूर्ण पाठिंबा देऊन त्यांनाही विजयी केले याचा अर्थ मी ज्याच्या सोबत आहे तो आमदार होतो अशी परिस्थिती असून या विधानसभा निवडणुकीमध्ये मी त्या पक्षाच्या उमेदवारीचा प्रबळ दावेदार असूनही शरद पवार साहेबांनी माझा केसाने गळा कापल्यामुळे मला उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर आम्ही ज्येष्ठ कार्यकर्ते एकत्रित बसून सुरेश धस यांना पाठिंबा जाहीर केला आहे आष्टी पाटोदा आणि शिरूर या विधानसभा मतदारसंघातील पुढील कार्यकाळातील विकास कामा च्या अंमलबजावणीसाठी आणि मतदारसंघाच्या उज्वल भवितव्यासाठी सुरेश धस यांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील जनतेचा सुरेश धस यांना वाढता पाठिंबा असून गेल्या दहा वर्षातील दोन्ही आमदारांचा कारभार पाहून लोकांनी यावेळी माहोल बदलण्याचा निर्णय घेतला असून सुरेश धस यांच्याशिवाय आष्टी पडत आणि शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक यांच्यासह ऊसतोड कामगार दलित शोषित या समाजासाठी सामाजिक सुखदुःखात सामील होणाऱ्या सुरेश धस यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्णय लोकांनीच निवडणूक हातात घेऊन केलेला आहे असे दिसून येत आहे असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी दौलावडगावचे मा.उपसरपंच बबलू शेठ कुरेशी, मिरा मामु शेख, ताज खान यांच्यासह सुलेमान देवळा येथील विनायक आप्पाजी घोडके (माजी सरपंच), बाळासाहेब रामभाऊ तोरडमल,ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सुरेश धस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षामध्ये जाहिर प्रवेश केला.
सुरेश धस यांनी लोणी जि.प.गट मारुती मंदिर,लोणी सय्यदमीर,दौलावडगाव जि.प. गट,हनुमान मंदिर, दौलावडगाव सुरुडी पं.स.गण सुरुडी फाटा,डोईठाण,पाटोदा शहर व वाडी/वस्ती यांनी या गावांना गट आणि गावनिहाय हाऊसफुल बैठकीत घेतल्या.
!या प्रसंगी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई (आठवले गट) व मित्रपक्षांचे पदाधिकारी, दौलावडगाव जि. प. गटातील नागरिक, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.