शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षात प्रवेश
आम्ही तुमच्यासोबत; मतदारांनी दिला आ.संदीप भैय्यांना विश्वास
बीड प्रतिनिधी : बीड मतदारसंघातील कामांची असलेली जाण आणि शहरासह गावोगावच्या ग्रामस्थांशी असलेला थेट संपर्क यामुळे या निवडणूकीत तरुण,युवक मित्र आ.संदीप क्षीरसागर यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिले असून त्यांनीच निवडणूक हाती घेतल्याने जाईल तिथे आ.संदीप क्षीरसागर यांच्या लोकप्रियतेचा करिश्मा दिसून येत आहे. निवडणूक प्रचारार्थ आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील शाहुनगर व बालेपीर येथे कॉर्नर बैठक घेतली. याच बैठकीतून कार्यकर्त्यांनी ‘संदीपभैय्या आम्ही तुमच्यासोबत असल्याचा विश्वास दिला. तसेच या दोन्ही ठिकाणच्या बैठकीत असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश खेला. आपण सर्वांनी येत्या २० तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून मला आपल्या सेवेची पुन्हा संधी द्यावी. तुम्ही सर्व जिवाभावाची माणसं माझ्यासोबत असल्यानेच आपला विजय निश्चित आहे असे प्रतिपादन याप्रसंगी आ.संदीप क्षीरसागर यांनी केले.
बीड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी निवडणूक प्रचारार्थ शनिवारी (दि.१६) बीड शहरात विविध भागात कॉर्नर बैठका घेवून मतदारांशी संवाद साधला.याप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान बीड विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराच्या अगदी सुुरुवातीपासून आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांच्यासह पक्षाच्या सर्व जेष्ठ मार्गदर्शक नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. गावोगावी संवाद दौरे, कॉर्नर बैठका, प्रत्यक्ष गाठीभेटी घेत प्रचार पुर्ण करत मतदार बंधु-भगिणींसह वडिलधारी मंडळींचे आशिर्वाद घेतले.
शनिवारी आ.संदीप क्षीरसागर यांची शहरातील शाहूनगर आणि बालेपीर भागातील कॉर्नर बैठकीला सभेचे स्वरूप आले. जमलेल्या युवकांसोबत अतिशय उत्साह आणि जोषपूर्ण वातावरणात आ.संदीप क्षीरसागर यांनी मतदारांशी संवाद साधला.आपला बीड जिल्हा आणि बीड मतदारसंघ कायम आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या भूमिकेसोबत,विचारांसोबत राहिलेला आहे. आता संघर्षाच्या स्थितीतही आपण त्यांच्यासोबत कायम राहण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणूनच पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी पक्षाचा व महाविकास आघाडीचा बीडचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी उमेदवारी आहे. येत्या २० तारखेला आपण सर्वांनी अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मला पुन्हा प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी उपस्थित मतदार बंधूना केले.
*अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश*
शहरातील शाहूनगर येथे झालेल्या कॉर्नर बैठकीत जयदीप राऊत व बालेपीर येथील वसीम भाई यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि महाविकास आघाडीचे बीड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आ.संदीप क्षीरसागर यांनी स्वागत केले. सर्व युवक,तरुण मित्रांच्या खांद्याला खांद्या लावून मतदारसंघात काम करेल असा शब्द आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी दिला.

















