शिरूर तालुक्यात सुरेश धस यांची प्रचारात आघाडी..
शहरात सुरेश धस यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली
आष्टी प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून माजी आमदार सुरेश धस यांनाच आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.शनिवार १६ नोव्हेंबर रोजी शिरूर तालुक्यातील गाव भेट दौऱ्यात २० ते २५ गावांना भेटी देत कॉर्नर बैठकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई (आठवले गट) व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार धस सुरेश रामचंद्र यांनी संवाद साधला.
यावेळी शिरूर शहरांमध्ये सुरेश धस यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या भव्य रॅली दरम्यान शहरातील प्रत्येक भागात जाऊन मायबाप जनतेशी संवाद साधत सुरेश धस यांनी आशीर्वाद घेतले.
यावेळी कॉर्नर बैठकीत बोलताना धस मम्हणाले शहरातील विविध भागांच्या विकासाच्या दृष्टीने चर्चा केली. तसेच शहराच्या बाजारपेठ मोठी करण्याबाबत मी सदैव प्रयत्नशील राहून मी या नगरपंचायत च्या मार्फत अनेक विकास कामे शहरात केली असून येणाऱ्या काळात मला शहराचा कायापालट करण्यासाठी तसेच आगामी काळात माझी असलेली ध्येय-धोरणे प्रभावी मांडण्यासाठी मला समर्थन व साथ ध्या
येत्या २० तारखेला अनुक्रमांक ३ वरील “कमळ” या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करावे अशी विनंती करत.आजच्या रॅली आणि बैठकीला जनतेचा हा उदंड प्रतिसाद मला निश्चितच बळ देणारा आहे अशी भावना यावेळी भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांनी व्यक्त केली.यामध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी, युवक तसेच शहरातील नागरिकांनी हजारोच्या संख्येने सहभागी होऊन धस यांचे जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करत स्वागत केले.शनिवारी शिरूर कासार तालुक्यातील
भिलारवाडी,जेधेवाडी,जाटनांदूर,उखळवाडी,सवसवाडी,चाहुरवाडी,वडळी (मदमापुरी), पिंपळ्याचीवाडी,खोल्याचीवाडी,राक्षसभुवन,
विघनवाडी,कान्होबाचीवाडी,बावी,आनंदगाव,शिरूर का. शहर,दहिवंडी/ उत्तमनगर,वारणी, कोळवाडी,रुपुर,सिंदफणा,गोमळवाडा या गावांना भेटी देत कॉर्नर बैठका घेतल्या व संवाद साधला या प्रसंगी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई (आठवले गट) व मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूक प्रचाराचा शेवटच्या टप्प्यातही सुरेश धस यांना सर्वाधिक प्रतिसाद
आष्टी विधानसभा मतदार संघातून माजी आमदार सुरेश धस हे भाजप , शिवसेना,रिपाई आठवले गट व मित्र पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत .निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ठीकठिकाणी फुले उधळून वाजत गाजत त्यांच्या गावामध्ये स्वागत करण्यात आले . आताही ते चित्र कायम असून , त्यांना प्रत्येक गावात मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता वेळेचा ही अभाव जाणवत आहे. एरवी ही लोकांच्या कामासाठी 24 तास 365 दिवस उपलब्ध असणारे आमदार असे सुरेश धस यांची ओळख आहे. निवडणुकीसाठी मात्र त्यांना प्रत्येकाला उत्तर देताना तोही वेळ कमी पडतो . एवढा लोकांचा त्यांच्याकडे ओढा आहे. माजी आमदार सुरेश धस हे ज्या ज्या गावात गेलेत त्या गावांमध्ये किमान दोन तास आधीच लोक त्यांची वाट पाहत असल्याचे चित्र आहे . त्यामुळे मतदारांचा कौल आगामी निवडणूक निवडणुकीमध्ये काय असेल हे जाणकार व्यक्ती लगेच सांगू शकेल. हिरवी उमेदवार नियर मी इतर उमेदवार गावात प्रचाराला गेले की त्यांना मतदारसंघाची वेळ येते दस यांच्या बाबत मात्र उलटे चित्र आहे त्यांच्या नियोजित दौऱ्याचा गावामध्ये माहिती होताच वेळ आधीच लोक गावाचा विषयावर चौकात जमा होतात तिथे बसले की धस पोहचले की त्यांचे जोरदार स्वागत केले जातात आणि मग गावातील कुठलाही प्रांगणात त्यांची छोट्या खाणीत जरी सभा असेल तरी लोक त्यांचे विचार ऐकण्यासाठी तनवायतेने उपस्थित असतात.