रोहित पवार यांचे अवाहन, पृथ्वीराज साठेंचे पारडे झाले जड
अंबाजोगाई/प्रतिनिधी: महायुतीच्या सरकारने पिकांच्या नुकसानीचे अनुदान व पिक विमा न दिल्याने शेतकरी व कष्टकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या या सरकारला जागा दाखवा, असे आवाहन रोहीत पवार यांनी शनिवारी (दि.१६) येथे केले.
केज मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत रोहित पवार बोलत होते. यावेळी खा.बजरंग सोनवणे, माजी आ.संगीता ठोंबरे, माजी आ.उषा दराडे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, अंजली घाडगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.रोहित पवार महायुतीच्या कारभारावर सडकून टीका करताना म्हणाले, या सरकारने तेलाचे भाव वाढवले पण शेतकऱ्यांकडे पिकणाऱ्या सोयाबीनचा भाव कमी केला. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. केज मतदार संघातील आमदारही शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करू शकले नाहीत. या सरकारचा अन्याय जनता आता सहन करणार नाही त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणार आहे असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महिलांना प्रतिमा आतापेक्षा दुप्पट ३ हजार रूपये मानधन देणार, अंबाजोगाईसाठी एम आय.डीसी आणणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. अंबाजोगाईचा मुख्य प्रश्न जिल्हानिर्मीतीचा आहे. सरकार आल्याबरोबर मार्गी लावण्याचा प्रयत्न करू सांगून सर्वसामान्य उमेदवार पृथ्वीराज साठेंना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.बजरंग सोनवणे म्हणाले, मागच्या निवडणुकीत विद्यमान आमदाराचे पती यांनी शरद पवारांना सोडणार नसल्याची शपथ घेतली होती. तेच पवार साहेबांना १० दिवसात विसरण्याची आठवण करून दिली.यावेळी इतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भाषणे झाली. सभेच्या प्रसंगी नागरीक व मतदारांनी पृथ्वीराज साठे यांना निवडणुक निधी सुपूर्द केला. हे पाहून सामान्य उमेदवाराला वोट पण व नोट पण मिळत असल्याचे वक्तव्य उपस्थितांनी केले.