जयंत पाटील यांचा सवाल; विचाराने पक्के असलेले महेबूब शेख यांना निवडूण देण्याचे आवाहन
पाटोदा: निवडणूका आल्या की हिंदू खतरे में है, असे म्हटले जाते. मग अंतरवाली सराटी शांततेत आंदोलन करणाऱ्या लोकांवर पोलीसांकरवी हल्ला केला ते लोक हिंदू नव्हते का?, त्यांचावर हल्ला का केला. यामुळे या सरकारची चाल ओळखून आता विचारांनी पक्के असलेले महेबूब शेख यांना निवडून द्या, असे अवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
पाटोदा येथे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेबूब शेख यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवाजी राऊत, सतिष शिंदे, आनंद जाधव, मा.आ.उषा दराडे, महादेव नागरगोजे, गुलाबराव घुमरे, नरसिंह जाधव, तालुकाध्यक्ष शिवभुषण जाधव, शिवसेना जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते, विक्रम मस्के, विद्याधर येवले, आण्णासाहेब येवले यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, एकीकडे लाडकी बहिनीला पैसे दिल्याचे सांगता पण दुसरीकडे महागाई किती वाढली, हे सांगत नाहीत. आता वर्षाला नागरिकांकडून ९६ हजार रूपये काढतात आणि इकडे पाच हजार रूपये वाटल्याची टिमकी वाजवितात. आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघात महेबूब शेख यांच्या रूपाने तरूण चेहऱ्याला संधी आम्ही दिली आहे. आपण त्यांच्यामागे ठामपणे उभा रहावे, पाटोद्याला ३५ वर्षापुर्वी एमआयडीसीसाठी जमीन घेतली मात्र, पुढे काहीच झाले नाही. मग येथील नेत्यांनी केले काय. महेबूब शेख यांनी आजवर महाराष्ट्र पिंजून काढला आहे. हा तरूण सभागृहात गेला तर ते सभागृह गाजवून सोडतील आणि सामान्य माणसांचा आवाज बनतील. याठिकाणी मतदारसंघात काही लोकांना निवडणूक आपली मक्तेदारी असल्याची भावना झाली आहे. यातील काहींनी शरद पवारांसोबत गद्दारी केली. या गद्दारांना प्रायश्चित्त द्या. येणाऱ्या काळात महेबूब शेख यांच्या माध्यमातून या मतदारसंघातील सर्व प्रश्न मार्गी लावू, असा शब्दही जयंत पाटील यांनी दिला.
००
आनंद जाधवांचा प्रवेश अन् टाळ्यांचा कडकडाट
पाटोदा येथील आनंद जाधव हे मोठे प्रस्त आहे. पंचायत समितीचे सभातपीपद त्यांच्या घरात राहिलेले असून तालुक्यातील गावागावात त्यांची मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात आहे. मागील काही वर्षांपासून ते भाजपमध्ये नाराज दिसत होते. अनेकदा त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमाला जाणे देखील टाळलेले दिसत होते. अखेर जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी शनिवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांच्यासोबत अनेक सरपंच देखील राष्ट्रवादीत दाखल झाले.
फडणविसला मुख्यमंत्री करायचे का?, लोक म्हणाले नाही…
राष्ट्रवादीचे उमेदवार महेबुब शेख यांनी अंतरवाली सराटी येथील मराठा बांधवावर हल्ला कोणी केली. आंदोलन करणे चुकीचे होते का, हे सर्व फडणविस यांनी केले. आता पुन्हा त्यांना मुख्यमंत्री करायचे आहे का?, असे म्हणताच, लोकांनी नको, असे म्हटले. निवडणूक जातीपातीवर आणू नका, लोकसभेत तुमची जात कुठे गेली होती, असा प्रश्नही त्यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे विरोधकांना विचारला.