ज्योतीताईंच्या विजयासाठी हिंदू ,मुस्लिम महिलांनी केला निर्धार
सर्वसामान्य महिला ज्योतीताईंच्या पाठीशी – मनीषा कुपकर
बीड (प्रतिनिधी) अपक्ष उमेदवार डॉ. ज्योती विनायकराव मेटे या बीड विधानसभा निवडणुकीच्या मैदानात “बॅटरी टॉर्च” हे निवडणूक चिन्ह घेऊन उतरल्या आहेत. त्यांच्या प्रचारार्थ महिला कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागासह बीड शहर पिंजून काढले आहे. यात त्यांना महिला मतदारांचा प्रतिसाद मिळत असून डॉ.ज्योती मेटे यांच्या प्रचारासाठी बीड शहरात महिला कार्यकर्त्या घरो घरी महिला मतदारांना आपले बहुमूल्य मत त्यांच्या पदरात टाकण्याची विनंती करत आहेत. तर महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता सर्वसामान्य महिला डॉ. ज्योती ताई मेटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. असे या फेरी दरम्यान शिवसंग्राम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ॲड.मनीषा कुपकर यांनी केले आहे.
बीड विधानसभा मतदारसंघात एकमेव महिला उमेदवार डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे आहेत. एक उच्चशिक्षित आणि उच्च पदस्थ अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. महिला सक्षमीकरणा बाबत बोलून काहीही उपयोग होणार नाही. यासाठी महिलांच्या समस्यांची जाण असणारी महिला विधानसभेत जाणे गरजेचे आहे. याकरिता महिलांनी डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्धार केला आहे. आणि येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी मतदानातून डॉ. ज्योती मेटे यांना बॅटरी टॉर्च या चिन्ह समोरील बटन दाबून महिला इतिहास घडवणार आहेत. असा ॲड. मनीषा कुपकर यांनी विश्वास व्यक्त केला आहे. याप्रसंगी साधनाताई दातखीळ गेवराई तालुका अध्यक्ष, सौ संगीता लाटकर,रेखाताई तांबे, अनिताताई घुमरे, माधुरी गोरे गीतांजली देसाई अँड सुमया शेख,माधुरी गोरे, संगीता ठोसर, साक्षी हंगे,महिला आघाडी सरचिटणीस.मंगल तांबडे, अंजलीताई पटाईत,भाग्यश्री साबळे, प्रियंका शिरसाट शकुंतला मोरे, शेळके कुसुम, चव्हाण आशा, वैशाली तुकाराम जगताप ,स्वाती सचिन मोटे आशा जाधव,कुसुम शेळके, आशा जाधव सत्यशीला हावळे आदींची उपस्थिती होती.