माझ्या प्रत्येक संघर्षात इथल्या मातीतील माणूस माझ्या पाठीशी उभा राहिला, हा विश्वास कायम जपून ठेवीन – मुंडेंचा शब्द
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे धनंजय मुंडे यांच्या सभेत नागरिकांचा प्रचंड उत्साह
अंबाजोगाई – घाटनांदूर व परिसरातील नागरिकांनी माझ्यावर व मुंडे कुटुंबावर अतोनात प्रेम केले. या भागात रस्ते विकास असेल किंवा पूस येथील पद्मावती देवीसह विवीध विकासकामांना निधी असेल, अनेक दिलेले शब्द मी पूर्ण केले. येणाऱ्या काळात देखील मी या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला प्रत्येक वादा पूर्ण करण्यास मी कटिबद्ध आहे, असे मत धनंजय मुंडे यांनी घाटनांदूर येथील जाहिर सभेत बोलताना केले आहे.
माझ्या प्रत्येक संघर्षात इथल्या मातीतील अठरा पगड जाती व विविध धर्मातील माझे सहकारी व इथली जनता माझ्या खंबीरपणे पाठीशी उभी राहिली आहे. तुमचा हा विश्वास मी कायम हृदयात जपून ठेवेन, असा शब्दही यावेळी बोलताना श्री मुंडे यांनी दिला.
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विराट जाहीर सभा संपन्न झाली. या सभेस अध्यक्ष म्हणून महादेव अप्पा पिंपळे, माजी आ.संजय भाऊ दौंड, जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, नेताजी देशमुख, देविदास काटे, महेश गारटे, ज्ञानोबा जाधव, शिवाजीराव सिरसाट, बाळासाहेब देशमुख, संभाजी गित्ते, सत्यजित सिरसाट, अजितदादा देशमुख, सुधीर चाटे, दत्ता काका जाधव, प्रदीप वैद्य, शरद बावणे, सुभाष चव्हाण, सलाम कुरेशी, बंडू गित्ते, आत्माराम गित्ते, दिलीप गित्ते, पांडुरंग सारडा, महेबूब शेख, संतोष शेटे, कलंदर भाई, विश्वाम्भर फड, राजवर्धन दौंड, गणेश देशमुख, अजय गंडले, श्रीमंत शिंदे यांसह आदी उपस्थित होते.
धनंजय मुंडे यांनी पुढे बोलताना परळी मतदारसंघात जलजीवन मिशनमधून सुरू असलेली कामे, पर्यटन विकास मधून पूर्ण केलेली व सुरू असलेली कामे,यांसह विविध तीर्थक्षेत्रांचा विकास त्याचबरोबर सोयाबीन संशोधन व प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून आगामी काळात होणारे लाभ आदी विषयांवर प्रकाश टाकला.