प्रस्थापितांनी दुर्लक्षित ठेवलेल्या नाळवंडी सर्कलचा कायापालट करणार – डॉ. ज्योती मेटे
बीड प्रतिनिधी : अपक्ष उमेदवार डॉ. ज्योती विनायकराव मेटे या बीड विधानसभा निवडणुकीच्या मैदानात बॅटरी टॉर्च हे निवडणूक चिन्ह घेऊन उतरल्या आहेत. बीड मतदारसंघातील पहिला प्रचार फेरीत त्यांनी आघाडी घेतली असून मतदारसंघातील सर्व गावांना त्यांनी भेट दिल्या आहेत. आता त्यांचा भर जाहीर सभेंवर आहे दी. १४ रोजी बीड येथे जाहीर सभा पार पडल्यानंतर काल त्यांनी नाळवंडी सर्कल मधील मतदारांशी संवाद साधण्यासाठी नाळवंडी येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. नाळवंडी सर्कलच्या जोरावर कायम येथील प्रस्थापितांनी सत्ता उपभोगली मात्र नाळवंडी सर्कलचा विकास केला नाही. नेहमीच या सर्कलला सावत्रपणाची वागणूक मिळाली मात्र आपण निवडून आल्यानंतर या सर्कलचा कायापलट करू असे आश्वासन त्यांनी या सर्कल मधील तमाम जनतेस दिले.
लोकनेते विनायकराव मेटे यांनी नाळवंडी सर्कल मध्ये अनेक गावांना निधी दिला विकासाला चालना दिली या ठिकाणी घोडका राजुरी, नाळवंडी गावांना महत्वाचे असणारे पूल तयार करून दिले आपण देखील साहेबांच्या कामाचं अनुकरण करत बीड ते नाळवंडी रस्त्याचे काम व्हावे याकरिता जिल्हाधिकारी यांच्या सह वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले आणि करत राहील परंतु आमदार झल्या नंतर मी हा रस्ता करण्यासाठी कटीबद्ध राहील असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले . या सभे प्रसंगी शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद , जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, आशुतोष मेटे, सिताराम घुमरे, योगेश शेळके, बळी थापडे विजय सुपेकर डॉ. राजेंद्र बंड, राजेंद्र आमटे,चंदर राऊत, उल्हास घोरड ,गणेश कुटे, आदी. सह शिवसंग्रामचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्कल मधील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.