बीड, प्रतिनिधी- विधानसभा निवडूक तोंडावर येऊन ठेपलेली असताना बीड विधानसभा अपक्ष उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांना विविध संघटनेचा जाहीर पाठिंबा मिळत असून बीड मतदार संघात अनिलदादा यांची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काल दि. 15 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटनाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख अमर जैनुद्दीन यांच्या आदेशा नुसार बीड विधानसभा अपक्ष उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांना विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. तसेच सर्वांनी मिळून बीड विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सूचित केले की, अनिलदादा जगताप यांनाच सहकार्य करावे आणि विक्रमी मताधिक्याने निवडून आणावे. याप्रसंगी महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटनाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख अमर जैनुद्दीन, प्रा.पंडीत तुपे, अॅड. नजर खान, शेख खय्युम इनामदार, शेख नसीरभाई बीड जिल्हाध्यक्ष, सुंदर वाघमारे, जयत शिवाजीराव वाघ बीड जिल्हा उपाध्यक्ष, हनुमंत बाबासाहेब मिसाळ बीड तालुकाध्यक्ष, शेख खय्युम बीड शहराध्यक्ष, शेख खदीरभाई, शेख असरार बीड शहर उपाध्यक्ष, सय्यद फेरोज बीड तालुका उपाध्यक्ष, रौफ शेख उपस्थित होते. या सर्वांनी मिळून अनिलदादा यांना पाठिंब्याचे पत्रक ठेऊन विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान अनिलदादा यांनी महाराष्ट्र बांधकाम मजूर संघटनेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार व्यक्त केले.

















