– प्रशासनाने बुळगेगिरी सोडावी
– अँड. अजित देशमुख
बीड ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य सरकारने लॉक संदर्भात राज्यभरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण निर्णय घेतला आहे. आता याला विरोध करणे म्हणजे कोरोणाला घरात आमंत्रण देणे आहे. त्यामुळे आता कोणीही विरोध न करता नियमाचे कठोरतेने पालन करावे. कोरोना स्वतःच्या घरापर्यंत येणार नाही याची काळजी घ्यावी. जनता आता या निर्णयाच्या बाजूने असून प्रशासनाने बुळगेगिरी सोडून नियमांचे कठोरतेने पालन करावे, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
राज्य सरकारने विरोधी पक्ष, अन्य संघटना, जेष्ठ पत्रकार यांचे बरोबर सल्ला मसलत करून या संदर्भात आज निर्णय घेतला आहे. उद्यापासून तिस एप्रिल पर्यंत हे लॉक डाऊन जाहीर केले आहे. जनतेचा संपूर्ण लॉक डाऊनला विरोध होता. त्यामुळे शासनाने आठ दिवसात या मुद्द्यावर सातत्याने चर्चा चालू केली होती. शेवटी सरकारने आज निर्णय जाहीर केला.
आता केवळ शनिवार आणि रविवार हे दोन दिवस राज्यभरात पूर्ण बंद राहणार असून उद्यापासून ३० एप्रिल पर्यंत रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत संचार बंदी असणार आहे. त्याच बरोबर अन्य दिवशी जमावबंदी आदेश देखील लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. या कारणामुळे सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम आता होणार नाहीत.
रात्री आठ ते सकाळी सात हा सर्वांचा विश्रांतीचा काळ असतो. त्याच बरोबर रविवार हा कामगारांसह सर्वांचा सुट्टीचा दिवस असंतो. शनिवार रोजी देखील शासकीय कार्यालय बंद असतात. त्यामुळे या दोन दिवसांचा जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणून जनताही हा लॉक डाऊन मान्य करत आहे.
आता दिवसभर फिरताना जनतेने मास्क लावणे वापरणे आवश्यक आहे. मास्क न लावणाऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात दंड करून शासनाच्या आदेशाची कठोरतेने अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने रस्त्यावर यायला हवे. प्रशासन जर कठोर राहिले नाही आणि नियम मोडणारांवर कारवाई करत नसेल तर हा लॉक डाऊन ठेवून त्यातही कोरोना वाढू शकतो. जनतेने या लॉक डाउनच्या निर्णयाच्या बाजूने ठामपणे उभे रहावे, असेही अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.