शिरूर रायमोह भागातून ताईंना लीड देण्याचा जनतेचा मानस – माऊली शिंदे, ज्ञानेश पानसंबळ
बीड : स्व विनायक मेटे सातत्याने अनेक नेते केवळ निवणूक आली की लोकांच्या भेटीगाठी घेतात आणि त्यांच्या समस्या सोडविण्याचे दिखावा करतात स्व विनायक मेटे निवडणूक असो किंवा, नसो त्यांचे सामाजिक कार्यापासून आणि लोकांना मदत करण्यापासून कधीच बंद राहिले नाही. स्व विनायकराव नेते यांच्यानंतर त्यांच्या कार्याची धुरा ज्योतीताई मेटे या समर्थपणे पार पाडत असताना दिसतात. आता त्या सक्रिय राजकारणातही सहभागी झाल्या असल्याने त्या बीड विधानसभा निवडणुकीत लढवत आहेत , बीड मतदारसंघात त्यांना मोठा वाढता प्रतिसाद मिळत आहे, बीड मतदार संघात शिरूर रायमोह भागातून ताईंना लीड देण्याचा जनतेचा मानस असल्याचे मत माऊली शिंदे, ज्ञानेश पानसंबळ यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी या भागातील जनतेने सुशिक्षित आणि उच्चपदस्थ अधिकारी राहिलेल्या डॉक्टर ज्योती ताई यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार केला आहे एक उच्चपदस्थ अधिकारी आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या ज्योतीताई बीडच्या आमदार झाल्या तर नक्कीच बीडचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास त्यांना आहे