शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील – सुरेश धस
शिरूर प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये फेक नेरिटीव पसरून संविधान बदलणार.. युसीसी आणणार.. मुस्लिमांना बाहेर काढणार.. अशा अफवा पसरवण्यात आल्या त्यातून माझा पराभव झाला परंतु मी रडत बसणार नाही आता महा विकास आघाडीवाल्यांना रडवणार आष्टी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश धस यांनी जनतेचे प्रेम मिळवले आहे त्यामुळे राज्यात भाजपा, शिवसेना, रिपाई (आठवले गट) व मित्र पक्षाचे युतीचे शासन पुन्हा एकदा आणावयाचे असल्यामुळे सुरेश धस यांना विजयी करा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शिरूर कासार येथील जाहीर सभेमध्ये केले.
यावेळी व्यासपीठावर छत्तीसगड येथील भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष चंदुलाल साहू, युवा प्रदेश चिटणीस अभिजीत शेंडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख,समाजसेवक विजय गोल्हार, शिरूर तालुका भाजप तालुकाध्यक्ष सुरेश उगलमुगले, नगराध्यक्ष गाडेकर, महेंद्र गर्जे आदि उपस्थित होते.पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की,सन 2017 मध्ये मी राज्याची ग्रामविकास मंत्री आणि बीड जिल्ह्याची पालकमंत्री असताना बीड जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवताना सुरेश धस यांनी अत्यंत धाडसाने त्यांचे नेतृत्वाखालील विजयी झालेले पाच जिल्हा परिषद सदस्यांचा पाठिंबा देऊन बीड जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसवला.त्यानंतर अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये शरद पवार यांच्यासारखा मोठा नेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रतिस्पर्धी समोर असताना दीडशे मतदार विरोधकांचे जास्त असताना सुरेश धस 80 मतांनी विजयी झाले. भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून ते परत विधान परिषदेचे सदस्य झाले सुरेश धस अत्यंत आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर होताच त्यांचे उमेदवारी निश्चित झाली होती परंतु जाहीर होताना तिसऱ्या लिस्ट म्हणजे त्यांचे नाव आले महा विकास आघाडीचे सरकार घालवून आता आपल्याला भाजपा शिवसेनेचे महायुतीचे सरकार स्थापन करायचे असल्यामुळे त्यांना विजयी करायचे असल्याने माझ्या या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ऊसतोड कामगारांनी मतदान करून त्यानंतरच कारखान्याला जायचे आहे. कारण ऊसतोडणी आणि वाहतुकीचा दर वाढवून देण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. आष्टी आणि निलंगा विधानसभा मतदारसंघांमध्ये रेकॉर्ड ब्रेक 92 हजार महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देऊन सुरेश धस यांनी मोठे काम केले असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी मतदार बांधवांना संबोधित करताना भाजपा शिवसेना रिपाई आठवले गट व मित्र पक्ष युतीचे उमेदवार सुरेश धस म्हणाले की, आष्टी विधानसभा मतदार संघात जलसंधारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृष्णा खोरे योजनेच्या माध्यमातून सीना मेहकरी, शिंपोरा ते कुंटेफळ प्रकल्प व पाईपलाईनचे काम पूर्णत्वास जात आहे. तसेच जायकवाडीच्या नाथसागरातून शिरुर का. व पाटोदा तालुक्याच्या डोंगर माथ्यावर शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील. मतदार संघातील रेल्वे भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, सिंदफना प्रकल्पाची उंची वाढवणे, सिंदफना नदीवर बँरेज उभारून शेतकऱ्यांना समाधानी करण्यासाठी प्रयत्न करणार. मतदारसंघात वन्यजीव व सामाजिक वनीकरण अंतर्गत हजारो हेक्टर क्षेत्र आहे, त्याठिकाणी देशी प्रजातीच्या औषधी वनस्पतीची लागवड करून त्यामाध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या रानडुक्करांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यासाठी आपण योग्य मार्ग शोधला असून त्यामुळे लवकरच डुकरांचा बंदोबस्त करण्यात येईल. यांसह आष्टी मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न, मार्गी लावण्यासाठी व मतदार संघातील नागरिकांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहील. असे उपस्थित मतदार बांधवांना आश्वाशीत करत दि. २० रोजी “कमळ” या चिन्हासमोर आपले मोलाचे मत देत सभागृहात आपली सेवा करण्यासाठी मला संधी द्यावी, अशी त्यांनी विनंती केली.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष गाडेकर म्हणाले की, काहीजण असे म्हणतात ओबीसी पॅटर्न चालवा परंतु माझ्याविरुद्ध प्रचार करताना ओबीसीतील माणसाला पाडण्यासाठी काही उमेदवार प्रयत्न करत होते. त्यावेळी ओबीसी पॅटर्न कुठे गेला होता असा सवाल केला. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अभिजीत शेंडगे बोलताना म्हणाले की, माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणाला सुरेश धस यांनी प्रदेश कार्यकारणीवर काम करण्याची संधी दिली त्यामुळे जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या या सुरेश धस यांना निवडून देण्याचे आवाहन केले. शिरूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुरेश उगलमुगले यांनी सुरेश धस यांनी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांबरोबर काम केलेले असल्यामुळे यामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पंकजाताई मुंडे यांना लहान बहिण समजून मोठ्या भावाची भूमिका घेऊन दोघांनी जिल्ह्याचा विकास करण्याची आवश्यकता असल्यामुळे सुरेश धस यांना विधानसभेत पाठवावे असे आवाहन केले
यावेळी मंचावर मा.खा. चांदुलाल साहू साहेब (भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष, ओबीसी मोर्चा तथा प्रभारी, आष्टी विधानसभा) भाजपा जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख, नगराध्यक्ष रोहिदास पाटील गाडेकर, राजेंद्र जाधव, अभिजीत शेंडगे (भाजपा, युवक सचिव), मा. सुखदेव सानप (अध्यक्ष, ऊसतोड संघटना), सभापती किरण शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश उगलमुगले, भगवत येवले, अरुण भालेराव (रिपाई), श्याम मारनावर (रासप), शिवसेना पदाधिकारी – रविराज बडे, राहुल चौरे, भरत जाधव, यशवंत खंडागळे, विजय गोल्हार, बाळासाहेब केदार, मधुकर गर्जे, प्रकाश खेडकर, महेंद्र गर्जे, वैजनाथ खेडकर, दादासाहेब भोसले, शिवाजी पवार, डॉ. मधुकर खेडकर, अशोक मामा पाखरे, अजिनाथ सानप चेअरमन, बाबुराव केदार, प्रकाश सोनसाळे, श्रीमती भाग्यश्री ढाकणे, खरमाटे मामा, शरद अण्णा ढाकणे, संजय आजबे, संतोष राक्षस, दिनेश गाडेकर, बाळासाहेब जावळे, सय्यद अभिषेक, सुधीर घुमरे, माजी तालुकाध्यक्ष, सय्यद अबुशेठ आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आष्टी-पाटोदा-शिरूर कासार मतदारसंघातील तमाम मतदार बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.