बीड प्रतिनिधी : विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा पहिला टप्पा संपत आला आहे. महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांनी रविवारी (दि.१०) बीड शहरातील मोमीनपुरा भागात पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधला. या पदयात्रेचा प्रतिसाद पाहून अल्पसंख्याक समाजाला गृहीत धरणाऱ्या विरोधकांच्या तंबूत घबराट निर्माण झाली आहे.
बीडमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मोमीनपुरा भागात पदयात्रा काढली. या पदयात्रेत नागरिकांची मोठी गर्दी होती. यादरम्यान ठिकठिकाणी त्यांचे स्वागत झाले. नागरिकांसह व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचा गजर करण्याची ग्वाही दिली. शहरातील मोमीनपुरासह इतर भागात देखील डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गाठीभेटी घेतल्या. यापूर्वी मराठा, मुस्लिम, ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नावर डॉ.योगेश क्षीरसागर यांनी वेळोवेळी सकारात्मक भूमिका मांडलेली आहे. त्यांच्याकडे सेक्युलर चेहरा म्हणून बीडकर पाहतात. या इमेजमुळे मुस्लिम समाजातून त्यांना पाठिंबा मिळत असून डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या विजयाचा मार्ग सुकर होत आहे. नुकत्याच झालेल्या पदयात्रेमुळे तर अल्पसंख्याक समाजाला गृहीत धरणाऱ्या विरोधकांच्या तुंबूत घबराट निर्माण झाली आहे.
अध्यक्षसाहेबांना कधीच विसरू शकत नाहीत..
गेली ३५ वर्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड शहराची सेवा केली. त्यांच्या हातून अल्पसंख्याक समाजाची अनेक कामे झाली. कब्रास्थान, दर्गा अशा स्थळांसह कोट्यावधींच्या निधीतून अनेक विकासकामे झालेली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव ‘अध्यक्षसाहेब’ सक्रिय राजकारणात नसले तरी त्यांना आमचा समाज काहीच विसरू शकत नाही, अशा भावना अनेक मुस्लिम समाज बांधवांनी व्यक्त केल्या.