क्षीरसागरांच्या पापांचा घडा भरला; शहर-ग्रामीण भागातील मतदार अनिलदादांच्या पाठीशी- प्रा. सुरेश नवले
बीड, प्रतिनिधी- गेली अनेक वर्ष सत्ता भोगून क्षीरसागरांना केवळ बीडकरांच्या विश्वासाचा घात करत स्वतःचे घरं भरण्याचे काम केले आहे आणि बीडकरांना विकास तर सोडाच पण मूलभूत गरजांपासून वंचित ठेवण्याचे महापाप केले आहे. सत्तेचा ताम्रपट घेऊन क्षीरसागरांच्या पिढ्यानुपिढ्या बीडवर आपली मक्तेदारी चालवत आल्या आहेत व बीड विकासाचा खेळखंडोबा करत आहेत. मात्र क्षीरसागरांच्या पापांचा घडा भरला असून सामान्य घरातील बीड विधानसभेचे अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांच्या पाठीशी शहर-ग्रामीण भागातील मतदार मोठ्या ताकदीने उभा राहिला असल्याचे माहिती माजी राज्यमंत्री प्रा. सुरेश नवले यांनी दिली आहे.
काल दि. 7 नोव्हेंबर रोजी सकाळपासून बीड विधानसभेचे उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांनी बीड मतदार संघातील चौसाळा जिल्हा परिषद गट पिंजून काढला असून वानगाव, गोगलवाडी, रौळसगाव, खडकी घाट, चांदेगाव, देवीबाभळगाव, जेबापिंप्री, पालसिंगण, हिंगणी खु., हिंगणी बु., रूईगव्हाण / माळेवाडी, मानेवाडी, पिंपळगाव घाट, वाढवणा, चौसाळा या सर्व गावात जाऊन कॉर्नर बैठका घेत ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच त्यांच्याशी मुक्त संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना अनुक्रमांक 13 चिन्ह शिवण यंत्र यावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. दरम्यान शहर आणि ग्रामीण भागातील मतदारांनी सुद्धा यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांना निवडून देण्याचा निर्धार केला आहे. याप्रसंगी अनिलदादा जगताप यांच्यासोबत सहकारी कार्यकर्ते समर्थक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्वच गावात ठीकठिकाणी अनिलदादा जगताप आणि प्रा सुरेश नवले यांचा हृदय सत्कार करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
—–
*चौकट*
*बीडच्या सर्वांगीण विकासाठी मला एकदा संधी द्या- अनिलदादा जगताप*
काल रोजी माजी राज्य मंत्री प्रा सुरेश नवले यांच्यासह बीड विधानसभा अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांनी शहर आणि ग्रामीण भागात कॉर्नर बैठका घेऊन ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेतल्या. यादरम्यान अनिलदादांनी मतदारांना बीडच्या सर्वांगीण विकासाठी मला एकदा संधी द्या. मी आपल्या अपेक्षेप्रमाणे बीडकरांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून बीडच्या विकासाचा कायापालाट करून दाखवेल फक्त मतदानरुपी मला एकदा आशीर्वाद द्या अशी विनंती करत अहवान केले.