सुरेश धस यांचे जेसीबीने फुलाने उधळण करत जंगी स्वागत
आष्टी (प्रतिनिधी)
मतदार संघातील गावोगावी असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या व्यक्तिगत आणि शासकीय कामकाज दुष्काळी परिस्थिती अनपेक्षित आलेले कोविड चे जीव घेणे संकटआणि नरभक्षक बिबट्याने निर्माण केलेली दहशत या काळामध्ये प्रशासनाशी संपर्क करून संकट ग्रस्त जनतेच्या मदतीसाठी मी केलेल्या प्रयत्न पेक्षा जास्त काम ज्या उमेदवारांनी केले असेल त्यांची माझ्या कामाची तुलना करूनच मला मतदान करावे असे भावनिक आवाहन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुरेश धस यांनी मुर्शदपुर जिल्हा परिषद गटातील गावोगावी मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आज सकाळी कासारी, मांडवा,राघापूर,शिदेवाडी, देसूर, चिंचाळा, शेकापूर, ब्रह्मगाव, कासेवाडी, आंबेवाडी, हाजीपुर,करंजी, पांगुळगव्हाण, भाळवणी, कर्हेवडगाव, कर्हेवाडी,पोखरी, पांढरी येथील गावभेट दौऱ्यात सर्व ग्रामस्थ, माता-भगिनी व तरुण मित्रांसह मतदारांशी संवाद साधला.
पुढे बोलताना धस भाषणात म्हणाले की, २००३ सालच्या भीषण दुष्काळात आष्टी परिसरातील शेतकऱ्यांसाठी दूध संघा मार्फत ५५ हजार जनावरांची राज्यातील सर्वात मोठी छावणी मी चालविली.कोरोना काळ असो की प्रत्येकाच्या वैयक्तिक अडचणी असोत, प्रत्येक अडचणीच्या काळात मी सर्वात अगोदर आपल्या मदतीला धावून आलो आहे. जर मी आपल्या अडीअडचणीत मदतीला धावून येत असेल तरच तुम्ही मला मत देण्यासाठी पुढे या. मी आमदार असताना जिल्हा परिषद शाळांमधील
“व्ही. रमणी पॅटर्न ” प्रभावी राबविल्याने आणि आपल्या भागातील विद्यार्थीसाठी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहिल्याने आज गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे.
गेली १० वर्षे या मतदारसंघाचा आमदार नसताना देखील २४ तास ३६५ दिवस आपल्यात माझ्या धस कुटूंबासह मी आपल्या सुख-दुःखात सहभागी झालो आहे. त्याचबरोबर विविध प्रकारची विकास कामे देखील केली आहेत. रात्री अपरात्री दोन,अडीच वाजता फोन आला तरी त्या माणसाची अडचण सोडविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आता माझ्या विरोधात उभे असलेले तीन ही उमेदवाराच्या घरातील आणि ते स्वतःदेखील कोणी आपल्या सुखा-दुःखात उपस्थित होते का ? आणि या पुढच्या काळात ते येतील का ? याचा विचार आपण करूनच मतदान करा असे भावनिक आवाहन केले
भाजपा, शिवसेना, रि.पा.ई. (आठवले गट) आणि मित्र पक्षाच्या सध्या असलेल्या सरकारने गोरगरीब, दीन दुबळ्या समाजातील घटकांसाठी तसेच महिलांसाठी अनेक प्रभावी व कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. मतदारसंघातील मतदार उत्साह आणि प्रतिसाद पाहता पुन्हा एकदा १९९९ च्या विधान सभा निवडणूकी सारखी परिस्थिती निर्माण झालेली असून येणाऱ्या 20 तारखेला “कमळ” या चिन्हासमोरील बटन दाबून सर्वाधिक मताधिक्य देऊन आपण मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन केले.
याप्रसंगी गावोगावी ग्रामस्थ, भारतीय जनता पक्ष,शिवसेना, रि.पा.ई.(आठवले गट) व मित्रपक्षांचे सन्माननीय पदाधिकारी,ग्रामस्थ मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने होते.
सुरेश धस यांचे जेसीबीने फुलाने उधळण करत जंगी स्वागत
दिवसातील 24 तास महिन्यातील तीस दिवस आणि वर्षातील बारा महिने, सुरेश धस आणि त्यांचे सारे कुटुंबीय लोकांच्या सेवेत तत्पर असतात… कोणाचा दवाखाना असो कुठे एखादी छोटी मोठी दुर्घटना घडलेली असो अथवा अपघात… सर्वात अगोदर मदतीला धावून येतात ते सुरेश धस व त्यांच्या कुटुंब…. हे साऱ्या आष्टी मतदार संघाने पाहिले आहे…. यामुळे सकाळी सात वाजता एखाद्या गावात धस गेले तरी तेवढीच गर्दी असते…आणि जागोजाग होणारे स्वागत समारंभ छोट्या-मोठ्या कॉर्नर बैठकीचे सभेत रूपांतर होऊन ढोल ताशाच्या स्वागतात जेसीबीने फुलाची उधळण होत असलेले दिसत आहे. यामुळे एखाद्या लहान मोठ्या गावात जायला खूप रात्र झाली तरी… पहाट असो या भिन्नरात्र गावागावात सुरेश धस नावाच्या जिथे कमी तिथे मी म्हणत धावून येणाऱ्या नेतृत्वाच्या स्वागतासाठी लोक प्रचंड संख्येने उपस्थित असतात दिसून येत आहे.